esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

खडकीत महाराष्ट्र बंदला सर्व स्थरातून प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकी : खडकी उपगरात महाराष्ट्र (Maharashtr) बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून खडकीतील मुख्य बाजारपेठेतील अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) लखिमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी खडकीतील महाविकास आघाडीच्या वतीने सकाळी दहा वाजता रॅली काढण्यात आली.तसेच चौका चौकात जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते.

त्यामुळे खडकी सराफ बाजार, किराणा बाजार, कापड बाजार यासह फळ, भाजी मंडई बंद असल्याने बाजारात आज शुकशुकाट होता. पी एम पी एम एल व रिक्षा संघटनाना देखिल प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून बंद मध्ये सहभागी होऊन सरकारला सहकार्य करावे असे आवाहन कारकर्ते करताना दिसत होते.

हेही वाचा: मिशन AIRLIFT, दोन विमानं सज्ज ठेवण्याचे एअर इंडियाला आदेश

दरम्यान वाकडेवाडी एस टी स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांची नियमित वाहतूक होत असून सकाळ पासून ते दुपारी 1 पर्यंत बसेसच्या प्रवासी वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती वाकडेवाडी एस टी आगार वरिष्ठ व्यवस्थापक अनिल भिसे यांनी दिली. एस टी स्थानकात प्रवाशांची नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून येत होती.

loading image
go to top