

B.Ed Admission:
sakal
पुणे : राज्यातील शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.एड.) ४८३ महाविद्यालयांमधील एकूण ३६ हजार ६९८ जागांपैकी तब्बल ३३ हजार ८७७ जागांवर विद्यार्थ्यांनी (९२.३१ टक्के) प्रवेश घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे.