esakal | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज मिळणार शून्य टक्के व्याजाने

बोलून बातमी शोधा

Farmers}

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळवून देण्यासाठी या बॅंकांना केंद्र सरकारकडून तीन टक्के आणि राज्य सरकारकडून दोन टक्के व्याज सवलत परतावा मिळत असे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज मिळणार शून्य टक्के व्याजाने
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी सुरू केलेला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज वाटपाचा ‘पॅटर्न’ आता राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षापासून (२०२१-२२) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ८) अर्थसंकल्प सादर करताना विधिमंडळात याबाबतची घोषणा केली. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळू शकणार आहे.

राज्यात पीक कर्जाचा व्याजदर हा द.सा.द.से. (दर साल, दर शेकडा) सात टक्के इतका आहे. मात्र यापैकी केंद्र सरकार तीन टक्के व्याज सवलत परतावा देत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज चार टक्के व्याजाने पडत आहे. याला पुणे आणि सातारा या दोन जिल्हा बॅंकांचा मागील सुमारे दीड दशकांपासून अपवाद आहे. या दोन्ही जिल्हा बॅंका या साधारणतः मागील पंधरा वर्षापासूनच तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने वाटप करत आहेत.

Maharashtra Budget 2021: रिंग रोड, पुणे-नाशिक लोहमार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळणार​

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळवून देण्यासाठी या बॅंकांना केंद्र सरकारकडून तीन टक्के आणि राज्य सरकारकडून दोन टक्के व्याज सवलत परतावा मिळत असे. उर्वरित दोन टक्के व्याजाच्या रकमेची भरपाई या दोन्ही जिल्हा बॅंका स्वतः नफ्यातून करत आहेत. हाच पॅटर्न आता राज्यभर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील सर्व जिल्हा बॅंका सरसकट सर्व शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज उपलब्ध करून देऊ शकणार आहेत.

भारीचं! आता मेट्रोतून करता येणार सायकलसह प्रवास​

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) २००६ पासून खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने वाटप करत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणे बंधनकारक आहे.

राज्यातील पीक कर्ज वाटप स्थिती
- राज्यातील एकूण शेतकरी - १ कोटी ५३ लाख
- कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी - ३१ लाख २३ हजार
- कर्जमाफीची एकूण रक्कम - १९ हजार कोटी
- चालू वर्षात वाटप केलेले पीक कर्ज - ४२ हजार कोटी
- राज्यातील जिल्हा बॅंकांची संख्या - ३४

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)