

One-Time NA Tax Approved by Cabinet
Sakal
पुणे : अकृषिक जमिनीवर (एन. ए.) नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता बांधकाम परवानगी देताना त्यांच्याकडून अकृषिक कराची एकरकमी (वन टाइम) आकारणी करण्यात येणार आहे तर, यापूर्वीच्या सोसायट्यांकडून वर्षनिहाय टप्पे करून एकरकमी कराची आकारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. हिवाळी अधिवेशनात कायद्यात दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुणे, मुंबईसह राज्यातील हजारो सोसायट्यांना फायदा मिळणार आहे.