

MBBS and BDS Vacancy Details
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) एमबीबीएस आणि बीडीएसच्या एकूण एक हजार ७६४ रिक्त जागांसाठी वैद्यकीय प्रवेशाची तिसरी यादी गुरुवारी रात्री उशिरा जाहीर झाली. चुकीची कागदपत्रे अपलोड करणारे १७० विद्यार्थी आणि कोणतीही कागदपत्रे अपलोड न करणारे ५० विद्यार्थी अशा २२० विद्यार्थ्यांना वगळून ही यादी जाहीर केली आहे. या यादीतून वगळलेल्या २२० विद्यार्थ्यांवर या आणि यापुढील प्रवेश फेरीत बंदी घातली आहे.