Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागात विकास कामांची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असंही सांगितलं. अजित पवार म्हणाले की, मी सकाळी लवकर कामाला सुरुवात केली. आता मी वेळेला महत्त्व देणार आहे. आज जरा जास्तच लवकर आलो. ग्रामीण भागात एकटा व्यक्ती काही करू शकत नाही, सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. गावं डिजिटल झाली पाहिजेत.