Maharashtra Education: अकरावी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून
Class11Admission: महाराष्ट्रातील अकरावीच्या ‘ओपन टू ऑल’ फेरीत तब्बल ३.२४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता १२ ऑगस्टपासून अकरावी प्रवेशाची विशेष फेरी सुरू होणार आहे.
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुली (ओपन टू ऑल) फेरी सोमवारी संपली. या फेरीत एकूण तीन लाख २४ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत.