जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी प्रक्रिया पूर्ण

जिल्हा बँक निवडणुकीसाठी 
मतदान प्रतिनिधी प्रक्रिया पूर्ण
Published on: 

वडगाव मावळ, ता. ६ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील विकास सोसायट्या व इतर सभासद संस्थांनी आपल्या संस्थेच्या वतीने बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारा प्रतिनिधी ठरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, तालुक्यातील एकूण १९१ संस्थांपैकी १२८ संस्थांचे ठराव प्राप्त झाल्याची माहिती मावळ तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक नवनाथ भोसले यांनी दिली.
जिल्हा बँक संचालक मंडळाच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारा प्रतिनिधी ठरविण्यासाठी सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला होता. त्यानुसार सप्टेंबरच्या अखेरीस ही प्रतिनिधी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. मावळ तालुक्यात २२ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान ही प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक नवनाथ भोसले यांनी दिली. या निर्धारित कालावधीत तालुक्यातील १९१ संस्थांपैकी १२८ संस्थांनी बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारा प्रतिनिधी ठरवून तो ठराव पाठविला आहे. तालुक्यात ‘अ’ वर्गातील (विविध कार्यकारी विकास सोसायट्या) ५६ सोसायट्या असून, त्यातील वडगाव वगळता उर्वरित ५५ सोसायट्यांचे ठराव प्राप्त झाले आहेत. ‘ब’ वर्गातील (पणन संस्था- खरेदी विक्री संघ व कांदा उत्पादक संस्था) दोन संस्था असून दोन्ही संस्थांचे ठराव प्राप्त झाले आहेत. ‘क’ वर्गातील (सहकारी पतसंस्था) ४४ संस्थांपैकी ३७ संस्थांचे ठराव प्राप्त झाले आहेत. ‘ड’ वर्गातील (इतर संस्था-हाउसिंग, मजूर) ७४ संस्थांपैकी ३२ संस्थांचे ठराव प्राप्त झाले आहेत. वैयक्तिक मधील (कंपनी,फर्म) एकूण १४ पैकी एका संस्थेचा ठराव प्राप्त झाला आहे. अपवाद वगळता सर्व संस्थांची बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारा प्रतिनिधी ठरविण्याची प्रक्रिया शांततेत झाली. हे सर्व ठराव जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले असून, लवकरच प्रारूप मतदार यादी जाहीर होईल, अशी माहिती भोसले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com