Maharashtra Court Employees Strike
esakal
पुणे : उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार दुय्यम व जिल्हा न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना “समान काम, समान वेतन” या न्याय्य तत्त्वावर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 34 हजार न्यायालयीन कर्मचारी उद्यापासून (दि. 17 नोव्हेंबर 2026) बेमुदत संपावर जात आहेत. पुणे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांतील अधिकारी व कर्मचारीही या बेमुदत संपामध्ये तीव्र निषेध नोंदवत सहभागी होणार आहेत.अशी माहिती संघटनेच्या वतीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली.