

Maharashtra Court Employees Suspend Strike Temporarily After Bombay High Court Intervention
esakal
पुणे : वेतनवाढीच्या मागणीसाठी पुण्यासह राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर बुधवारी (ता. १८) तात्पुरता स्थगित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.