Maharashtra District Courts Bomb Threat : न्यायव्यवस्था हादरली! पुण्याच्या शिवाजीनगरसह राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने मोठी खळबळ

Statewide high security alert in courts : कामकाज सुरू असतानाच न्यायाधीश, वकिलांची धावपळ; इमारती रिकाम्या करून बॉम्ब शोधक पथके तैनात, सायबर पोलिसांकडून वेगाने तपास सुरू
Bomb threat to a dozen courts across the state including Pune simultaneously.

Bomb threat to a dozen courts across the state including Pune simultaneously.

Sakal

Updated on: 

महाराष्ट्रातील संपूर्ण न्यायव्यवस्थेला हादरा देणारी एक अत्यंत अभूतपूर्व आणि गंभीर घटना सोमवारी दुपारी घडली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालया सहित मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील डझनभराहून अधिक जिल्हा व सत्र न्यायालयांना एकाच वेळी ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने राज्यभरातील न्यायालयांमध्ये हजारो पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी असतानाच हा धमकीचा संदेश धडकल्याने सर्वत्र एकाच वेळी प्रचंड खळबळ आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...