

खरिप पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६९ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ
--
विविध बँकांना १ हजार ५८१ कोटी ५५ रुपयांचे उद्दिष्ट
ॲग्रोवन वृत्तसेवा
.......................................
परभणी ः खरिप हंगाम २०२६ मध्ये राष्ट्रीयीकृत, सहकारी, ग्रामीण आणि खासगी मिळून एकूण १७ बँकांना १ हजार ५८१ कोटी ५५ लाख रुपये तर रब्बी हंगामात ६७८ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आले आहे. २०२५-२६ मध्ये खरिपात १ हजार ५११ कोटी ६० लाख रुपये, तर रब्बीत ७४८ कोटी ४० लाख रुपये उद्दिष्ट होते. त्या तुलनेत यंदा खरिप पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६९ कोटी ९५ लाख रुपये वाढ तर रब्बी पीककर्जाच्या उद्दिष्टात ६९ कोटी ७३ लाख रुपयांनी घट करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात ११ राष्ट्रीयीकृत बँका, १ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, १ ग्रामीण बँक आणि ४ खाजगी बँका मिळून एकूण १७ बँकांना पीककर्ज व मुदत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते. जिल्हा वार्षिक कर्जपुरवठा आराखडा २०२६-२७ नुसार कृषी कर्ज वाटपाचे ३ हजार ७५० कोटी २ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यात खरिप पीककर्ज १ हजार ५८१ कोटी ५५ लाख रुपये व रब्बी पीककर्ज ७४० कोटी ५८ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. खरिप आणि रब्बी मिळून एकूण २ हजार २६० कोटी २ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण १ हजार ४९० कोटी रुपये मुदत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. पीककर्ज व मुदत कर्ज मिळून एकूण ३ हजार ७५० कोटी २ लाख रुपये कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.
...
परभणी जिल्हा बँक निहाय २०२६-२७ खरिप व रब्बी पीककर्ज वाटप उद्दिष्ट स्थिती (कोटी रुपये)
बँक...खरिप पीककर्ज...रब्बी पीककर्ज
भारतीय स्टेट बँक...५११.०२...२१९.०३
महाराष्ट्र ग्रामीण बँक...३४९.९४...१५०.०३
जिल्हा सहकारी बँक...३००.९८...१३१.९३
बँक ऑफ बडोदा...६९.८८...३०.१४
बँक ऑफ इंडिया...१३.९५...६.०६
बँक ऑफ महाराष्ट्रा...७१.३६..३०.६२
कॅनरा बँक...५५.९०...२१.११
सेंट्रल बँक ऑफ इंडिया...१२.६०...५.४०
इंडियन बँक...१८.६७...८.००
इंडियन ओव्हरसीज बँक...११.६३...४.९८
पंजाब नॅशनल बँक...११.०६...४.७४
युको बँक...२२.१४...९.४९
युनियन बँक ऑफ इंडिया...३९.०५...१६.७४
ॲक्सिस बँक...३.८०...१.६५
एचडीएफसी बँक...४३.३७...१८.६३
आयसीआयसीआय बँक...२७.९९....१२.०१
आयडीबीआय बँक...१६.११...६.९१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.