

Maharashtra Water Storage News Reservoir Levels Increase Rapidly 49 Dams Release Water After Strong Monsoon Showers
sakal
पुणे : जुलैमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. जलसंपदा विभागाच्या लहान, मध्यम व मोठ्या मिळून ३,०२९ प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १,४२२.१२ टीएमसी आहे. त्यापैकी सध्या ९७९.४० टीएमसी (२७,७४१.५९ दशलक्ष घनमीटर), म्हणजेच ६८.८७ टक्के साठा झाला आहे.