

Ajit Pawar last rites held at Baramati son Parth and Jay perform final rituals
Esakal
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतीष्ठानच्या प्रांगणात अंत्यविधी पार पडले. अजितदादांना मुलगा पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांचा बारामतीत विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. अजित पवार यांना निरोप देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.