Maharashtra Day celebration : शिवनेरीवरील सुवर्णक्षणांना उजाळा; सह्याद्रीच्या पुढाकाराने जुन्नरमध्ये दरवर्षी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक महा उत्सव

शिवनेरीवरील सुवर्णक्षणांना उजाळा देत जुन्नरमध्ये ‘द फोक महाराष्ट्राची लोकधारा’ व वारकरी चित्ररथ दिंडी; सांस्कृतिक विभागाच्या विशेष निधीतून महाराष्ट्र दिन महाउत्सव
Commemorating the Birth of Maharashtra: Cultural Mahotsav in Junnar on May 7th

Commemorating the Birth of Maharashtra: Cultural Mahotsav in Junnar on May 7th

esakal
Updated on

जुन्नर : महाराष्ट्र दिनाच्या घोषणेपूर्वी २७ एप्रिल १९६० रोजी मंगल कलशाचे पूजन किल्ले शिवनेरीवर होऊन महाराष्ट्र राज्याच्या घोषणेची मूहूर्तमेढ रोवली गेली. या सुवर्णक्षणांना उजाळा देणारा सोहळा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून जुन्नर शहरात गुरुवार ता ७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमासह वारकरी चित्ररथ दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली. या सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात यावे अशी मागणी जुन्नर येथील सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि कलोपासक संस्थांनी मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक विभागाकडे केली होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्यता दिली आणि पहिल्या वर्षी त्यासाठी साडेनऊ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com