

Dattatray Bharne Drought Relief Maharashtra
esakal
Maharashtra drought relief package : पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, तूर यांसह खरीप पिकांना मोठा फटका बसला. अनेक भागांत पिके करपून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू झाल्याने संबंधित दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाच्या निकषानुसार मिळणाऱ्या सवलती देण्यात येतील. त्यांना टप्प्याटप्प्याने मदत केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.