'शिवभोजन'च्या उद्धाटनावेळी अजित पवारांच्या प्रश्नांनी पिकला हशा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

पुण्यातील पोलिस ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर अजित पवार यांनी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त उपस्थित होते.

पुणे : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळीला आज (रविवार) अनेक ठिकाणी सुरवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील शिवभोजन केंद्राच्या उद्घाटनावेळी विचारलेल्या प्रश्नांवर हे केंद्र चालविणाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले, तर उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे दिसले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील पोलिस ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर अजित पवार यांनी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त उपस्थित होते. उद्घाटनावेळी अजित पवार यांनी विचारलेल्या गमतीशीर प्रश्नांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

#RepublicDay2020 : पंतप्रधानांनी सुरु केली नवी परंपरा; अमर जवान ज्योती ऐवजी... 

अजित पवारांनी या केंद्राच्या उद्घाटनापूर्वी फित कापण्यापूर्वी, हे हॉटेल कुणाचं आहे? इथं किती जणांना जेवण दिलं जातं? गरजू ,गरीब कसे ओळखणार? काही लोक मुद्दाम साधे कपडे घालून येतील..., असे काही प्रश्न विचारलेल्या चालकांची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर अजित पवार यांनी उद्धाटनाचा कार्यक्रम उरकल्याचे पाहायला मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra DY CM Ajit Pawar ask some questions to shivbhojan center owner