महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहे हेच मोठ दुर्दैव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule

महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहे हे दुर्दैव्य

डोर्लेवाडी : महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार निर्मिती प्रकल्प हा दुसऱ्या राज्यात जात आहे हे आपल्या राज्याचे मोठे दुर्दैव्य आहे. राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन प्रधानमंत्री यांना विनंती केली पाहिजे, पण राज्यातील सत्ताधारी सरकार मधील मंत्री व नेते हे गुजरातला जाऊन तेथील उद्योगाचा आढावा घेणार असल्याचे बोलत आहेत, हे आपल्या राज्याचे अपयश आहे.असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

डोर्लेवाडी (ता.बारामती) येथे गावदौऱ्यानिमित्त आल्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी नुकताच पुणे जिल्ह्याचा दौरा केला.लोकशाहीत सर्वांना तो अधिकार आहे.आम्ही त्यांचे अतिथी देवो भव याप्रमाणे स्वागतच करतो.पुणे जिल्ह्यातील जनता विकासाच्या बरोबर चालते. आम्ही आजपर्यंत विकासाचे राजकारण केले आहे असे सुळे यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात गोरगरीब व कष्ट करणाऱ्या नागरिकांसाठी आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली होती.ती बंद करण्याचा निर्णय हे सरकार घेत असल्याचे समजते आहे हे अत्यंत चुकीचे असून या सरकारने गोरगरीब जनतेच्या योजनेत राजकारण आणू नये.

सध्याच्या सरकारने केंद्र सरकारच्या दबावाने महाराष्ट्राच्या विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत.हे अत्यंत दुर्दैवी आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्ली समोर कधीच झुकले नव्हते, मात्र हे सरकार वारंवार दिल्लीपुढे झुकत असल्याने या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा काही एक अधिकार नाही असे सुळे यांनी यावेळी नमूद केले.

अनेक दिवसांनंतर पुण्याला पालकमंत्री मिळाले याचा आनंद आहे.आतातरी सर्व कामे सुरळीत होतील.मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ६ हून अधिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे हे कितपत योग्य आहे.

मराठा आरक्षण संदर्भात आघाडी सरकार असताना कोणताही निर्णय झाला नाही आता मात्र सरकार बदलले की आघाडी सरकार विरोध करते.यावर मंत्री तानाजी सावंत यांनी आघाडी सरकारला लक्ष केले होते.त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यांना स्वत:च्या खात्याचा अभ्यास नाही जे रोज वेगवेगळया चुका करतात त्यांच्या बद्धल काय बोलायचे हे सावंत यांचे नाव घेता त्यांना टोला लगावला. दरम्यान आज सकाळच्या सत्रात तालुक्यातील डोर्लेवाडीसह मळद,गुणवडी,झारगडवाडी सोनगाव येथील नागरिकांशी सुळे यांनी संवाद साधला.यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.