दुष्काळातही जपले अनोखे पक्षीप्रेम

दुष्काळातही जपले अनोखे पक्षीप्रेम
Published on: 

वाल्हे, ता. १७ : कष्टातून पिकविलेल्या पिकातून निसर्गातील मुक्या जीवांचाही उदरनिर्वाह व्हावा, या संवेदनशील भावनेतून आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथील महिला शेतकरी शीतल पवार व उज्ज्वला पवार यांनी शेतातील बाजरीचे पीक पक्ष्यांसाठी राखून ठेवण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे. बाजरीची काढणी न करता त्यांनी हे पीक पक्ष्यांच्या दाणापाण्यासाठी खुले सोडले आहे.सध्या पुरंदर तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे-नाले, बंधारे कोरडे पडल्याने वन्यजीवांसह लहान-मोठ्या पक्ष्यांनाही अन्न आणि पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेतात येणाऱ्या पक्ष्यांना सहजपणे अन्न उपलब्ध व्हावे, या हेतूने पवार कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. आडाचीवाडी परिसरातील झाडांवर सकाळ-सायंकाळी विविध पक्ष्यांचे थवे येतात. बाजरीच्या कणसांतील दाणे टिपण्यासाठी शेकडो पक्षी शेतात जमा होत असून त्यांच्या किलबिलाटाने परिसर गजबजून जात आहे.

जैवविविधता टिकवण्यासाठी निर्णय
शेतीतील उत्पन्नाचा विचार करता पिकाची काढणी न करणे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या त्यागाचा असला तरी पक्ष्यांना अन्न मिळावे आणि निसर्गातील जैवविविधता टिकून राहावी, या भावनेतून तो घेण्यात आला आहे.
पवार कुटुंबीयांशी चर्चा करून तीन पांड क्षेत्रातील बाजरी पक्ष्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आडाचीवाडीचे माजी सरपंच दत्तात्रेय पवार यांनी दिली.

08469

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com