पुणे -भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण

पुणे -भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण
Published on

शेतकऱ्यांना वीजबिल
माफीची पत्रे पाठविणार
-----
मुख्यमंत्री फडणवीस ः पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणाची बैठक
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः महायुती सरकारने कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना, राजकीय लाभाच्या हेतूने सर्वांत मोठी शेतकरी कर्जमाफीच केली नसून शेतकऱ्यांच्या वीजबिल मुक्तीसाठी सरकार कार्यरत आहे. लवकरच ४८ हजार कोटींच्या थकीत वीजबिल मुक्तीची पत्रे शेतकऱ्यांना पाठविली जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ३१) दिले.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘काँग्रेसकडून फेक नरेटिव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे. यासाठी १८० संस्थांचा वापर केला जात आहे. याच संस्था काँग्रेसच्या काळात नक्षली संस्था म्हणून घोषित केल्या होत्या. त्यांच्या माध्यमातून आता चुकीच्या गोष्टी माओवाद्यांच्या लाल पुस्तकाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. याचा पुरावा म्हणजे ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील ४० मुद्द्यांपैकी २९ मुद्दे चुकीचे आहेत. हे पुराव्यांसह कर्नाटकातील एका विद्यार्थिनीने सादर केले. फॅक्ट चेक केले तर तिच्यावर एफआयआर दाखल केला. यामुळे हे ‘छात्रों की गुंज’ नाही तर ही ‘झुट की गुंज’ आहे.
‘‘मी आताच्या पिढीला ‘जेन झी’ म्हणत नाही मी त्यांना युवाशक्ती म्हणतो. या युवाशक्तीच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. यातूनच दुष्काळमुक्तीसाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला असून, पुढील पिढीला दुष्काळ पाहू दिला जाणार नाही. तसेच उद्योगांचे मॅग्नेट करत आहोत. तीन ते चार वर्षांत आपण स्टार्टअप इको सिस्टीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर येऊ हे आमचे स्वप्न आहे, असेही फडणवीस म्हणाले.
‘‘काँग्रेसने ही हिंदुत्ववादी विचारधारेला विरोध केला. राम मंदिरानंतर आता कुंभमेळा टारगेट करत आहेत. काँग्रेसने आता वैचारिक लढाई हारली असून, सीजेपीच्या माध्यमातून रामायणातील कालनेमी राक्षसासारखे विविध रूपाने आपल्या विचारसरणीवर आक्रमण करत आहे. सीजेपी ही छोटी संघटना नाही तर काँग्रेस चिताओ प्रोग्रॅम आहे.’’ असेही ते म्हणाले.
‘‘राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर टीका करताना फडणवीस म्हणाले, ‘‘वंदे मातरम् मातृसत्ताकचे प्रतीक आहे. हे वंदेमातरम् गात गात क्रांतिकारक फासावर गेले. सोनिया गांधींनी ते वंदे मातरम् मध्येच थांबवले आणि अपमान केला. काँग्रेस दुटप्पी असून, एकीकडे महिलांबाबत बोलायचे आणि दुसरीकडे मुस्लिम महिलांच्या पोटगीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेत बदलायचा, असे दुटप्पी ते वागत आहे. यामुळे राहुल गांधी यांनी ‘झुट की गुंज’ची नौटकी बंद करावी,’’ असेही फडणवीस म्हणाले.

चौकट
पुणेकरांनी देशाला आदर्श दिला पाहिजे
पुणे शहरात सध्या डीजेमुक्त गणेशोत्सवाची चळवळ सुरू झाली आहे. यामध्ये गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, भाजपचे काही पदाधिकारी यांच्यात वाक्‌युद्ध सुरू आहे. या वाक्‌युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर, ‘‘पुणेकरांनी देशाला, राज्याला दाखवून दिले पाहिजे, की सांस्कृतिक गणेशोत्सव कसा साजरा झाला पाहिजे.’’ असे म्हणत अप्रत्यक्ष डीजे समर्थक, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे कान टोचल्याचे बोलले जात आहे.

फोटो ओळी ----
पुणे ः भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप भाषणात सोमवारी (ता. ३१) बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com