महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला चालना

महाराष्ट्रात चित्रपट पर्यटनाला चालना
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महाराष्ट्राला चित्रपट चित्रीकरण आणि चित्रपट पर्यटनाचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ४९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा करार करण्यात आला.
नव्या करारानुसार ‘महाराष्ट्र चित्रपट पर्यटन’ या स्वतंत्र ब्रँडची निर्मिती करून राज्यातील चित्रीकरण स्थळांचा देश-विदेशात प्रचार करण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत मुंबई महानगर प्रदेशाबाहेरील पर्यटनस्थळांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. चित्रपटांचे चित्रीकरण झालेल्या महत्त्वाच्या ठिकाणी माहिती फलक, स्मृतिफलक आणि सेल्फी पॉइंट उभारण्यात येतील. तसेच चित्रपटांचे संदर्भ, ऐतिहासिक माहिती आणि परिसरातील पर्यटन आकर्षणे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना चित्रीकरणासाठी योग्य ठिकाणांची माहिती सहज मिळावी, यासाठी कृषी पर्यटन केंद्रे आणि खासगी ग्रामीण पर्यटनस्थळांचा महामंडळाच्या सिंगल विंडो प्रणालीत समावेश केला जाणार आहे.

ग्रामीण पर्यटनाला चालना
पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातील सामंजस्य कराराच्या माध्यमातून ‘लोकोत्सव’ महोत्सवाचे पुनरुज्जीवन, बहुभाषिक डिजिटल माहिती संग्रह आणि प्रादेशिक चित्रपट पर्यटन मार्गदर्शक तयार करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून स्थानिक रोजगार, खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि ग्रामीण पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.