

Pune
esakal
डी. के. वळसे पाटील
मंचर: अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून 'इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)' या विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.टेक.) अभ्यासक्रम सुरू करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी मान्यता दिली आहे. राज्यातील या विषयातील हा पहिलाच पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्याने इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.