

Maharashtra Tradition Volume Documents Maharashtra Food Culture With Ancient Recipes Nutrition and Festival Traditions
esakal
पुणे: ‘महाराष्ट्र खाद्य संस्कृती कोश’ या अनोख्या आणि खाद्य संस्कृती जपणाऱ्या कोशाच्या “महाराष्ट्राची परंपरा: सण, उत्सव आणि खाद्यसंस्कृती” या पहिल्या खंडाच्या दोन भागांचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मान्यतेने आणि टि.म.वि च्या माध्यमातून या कोशनिर्मितीचे कार्य चालू आहे.