

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : दूध, पनीर आणि अन्य अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीअंतर्गत कठोर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. भेसळखोरांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी तसेच अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसंदर्भात बैठक झाली. या वेळी विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी अन्न भेसळीच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. विशेषतः लहान मुले मोठ्या प्रमाणात दूध सेवन करतात. बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कोणतीही नरमाई दाखवू नये, असे शिंदे यांनी सांगितले. भेसळखोरांवर कारवाई करताना अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याबरोबरच कायदेशीर प्रक्रिया अधिक भक्कम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. न्यायालयीन प्रक्रियेत कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी नामवंत व ज्येष्ठ विधिज्ज्ञांची मदत घेऊन विशेष कायदेविषयक पथक तातडीने स्थापन करावे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.