

Big Relief for Forest Dwellers: Maharashtra Introduces New 7-E and 12-E Land Records
sakal
पुणे : वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा उतारा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियमांत सुधारणा करून वनहक्कधारकांसाठी स्वतंत्र ‘गावनमुना ७-ई’ आणि ‘गावनमुना १२-ई’ लागू केला जाईल. या निर्णयामुळे वनजमिनींवरील पिकांची स्वतंत्र नोंद घेता येणार आहे.