
Maharashtra Government Update
Sakal
पुणे : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी दरवर्षी मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या निधीचा कार्यक्षम व पारदर्शक वापर होण्यासाठी राज्य सरकारने ‘ई-समर्थ’ ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यात ही प्रणाली लागू केली असून आगामीकाळात संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.