Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाच नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी; पण कोणत्या परिसरात होणार?

Pune police station: पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या या भागात सुरक्षा सुधारेल.
Pune Police

Pune Police

esakal

Updated on

वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. या नवीन पोलीस ठाण्यांची ठिकाणे आणि कार्यक्षेत्रे गृह विभागाने २५ मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत निश्चित करण्यात आली आहेत. मांजरी, लक्ष्मीनगर, नरहे, लोहेगाव आणि कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या भागांमध्ये नवीन पोलीस ठाणी बांधण्यात येतील. हे भाग झपाट्याने विकसित होत असून येथील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ज्यामुळे सध्याच्या पोलीस ठाण्यांवरील कामाचा भार वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com