Commerce students submit degree certificate copies to university authorities as a symbolic protest against alleged discrimination in government recruitment policies.
esakal
पुणे
Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
Maharashtra Government Jobs : अकाउंटंट-ऑडिटर पदांसाठी ‘कोणतीही पदवी’ अट ठेवण्यावर विद्यार्थ्यांचा तीव्र आक्षेप. लेखा व वित्तीय पदांसाठी कॉमर्स पदवी अनिवार्य करण्याची प्रमुख मागणी. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा.
महाराष्ट्रातील शासकीय नोकर भरती प्रक्रियेत कॉमर्स (बी.कॉम) पदवीधरांवर होत असलेल्या सातत्यपूर्ण अन्यायाविरोधात विद्यार्थी आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.दरम्यान कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देत आपल्या पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करून प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला.

