Maharashtra Government
Sakal
पुणे
Maharashtra Government : राज्यात स्थापन होणार ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’, शहरांतील आरोग्य सेवेला मिळणार नवे बळ
Maharashtra Establishes Urban Health Commissionerate : शहरी लोकसंख्येला प्रभावी आणि समन्वित आरोग्य सेवा देण्यासाठी, राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्वतंत्र ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ स्थापन करण्याचा आणि त्यासाठी ‘आयुक्त, शहरी आरोग्य’ हे नवीन पद निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पुणे : राज्यातील वाढत्या शहरी लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या आरोग्यविषयक आव्हानांचा विचार करता, राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्वतंत्र ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या आयुक्तालयाच्या स्थापनेचा उद्देश शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख बनविणे हा आहे.

