
Maharashtra Education
Sakal
पुणे : शाळा केवळ ज्ञान घेण्याची जागा नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने घडण्याचे ज्ञान मंदिर आहे. याच ज्ञानमंदिरातून घडलेले माजी विद्यार्थी कायमच शाळेबद्दल ऋण व्यक्त करतात. अशा माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून शाळेच्या विकासात मोलाचा हातभार लागू शकतो. याच विचारातून आता राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करावा, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.