

Disciplinary Action: 15 Officers, Including 10 from Pune, Face Forced Leave
sakal
पुणे : जमीन महसूल अभिलेखातील कलम १५५ च्या तरतुदींचा गैरवापर केल्याप्रकरणी राज्य शासनाकडून कारवाईस सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात अतिगंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमधील पंधरा अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर पुण्यावरून बदली करून सध्या मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे.