esakal | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिले मोठे संकेत; आणखी तिघांची होणार चौकशी!
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant_Singh_Anil_Deshmukh

गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी बॉलीवूडमधील काही नामवंत मंडळीची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिले मोठे संकेत; आणखी तिघांची होणार चौकशी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता अभिनेत्री कंगना रनौत आणि तिच्या बहिणीची चौकशी केली जाणार आहे. तसेच करण जोहरला देखील चौकशीला बोलावले जाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभिनेता सुशांत सिंगने मागील काही दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणात बॉलीवूडमधील अनेकांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. तर या आत्महत्यमागे व्यावसायिक कारण (बिझनेस रायव्हलरी) तर नाही ना, याचाही पोलिस शोध घेत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलीवूडमधील कंपूगिरीच त्याच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची टीका केली होती. त्यानंतर या प्रकरणावरून बॉलीवूडमध्ये दोन गट पडले आहेत.

एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी!​

या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देशमुख यांनी शनिवारी बॉलीवूडमधील काही नामवंत मंडळीची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले. देशमुख म्हणाले, "सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत ३७ जणांची चौकशी झाली आहे. त्यामध्ये 'बिझनेस रायव्हलरी' असण्याची आहे का, याबाबत तपास केला जात आहे. कंगना रनौत यांनी त्याबाबत काही वक्तव्य केले होते. त्याविषयी त्यांची काही बाजू आहे, हे ऐकून घेतले जाईल. त्यांना आत्तापर्यंत ३ समन्स बजावले आहेत. त्यादृष्टीने कंगना आणि त्यांच्या बहिणीची तसेच करण जोहर याची देखील चौकशी केली जाणार आहे."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image