

Pune
esakal
नितीन बिनेकर
मुंबई: पुण्यातील विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू माफियांविरोधात राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. २८ मे ते ४ जून या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ३१२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ हजार ७५७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९ कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.