चाकण : राज्यात उद्योगांची स्थिती फार बिकट आहे. सुमारे ३५ हजार तीनशे उद्योग बंद झाल्याने रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत.असे माजी मंत्री , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. .चाकण ता. खेड येथील औद्योगिक वसाहतीतील व परिसरातील रस्त्यांची पाहणी माजी मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. तसेच प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.मागील काही वर्षांत राज्यातील सुमारे ३५,३०० उद्योग बंद पडले आहेत तसेच अनेकांनी राज्य सोडून इतरत्र स्थलांतर केले आहे. यामुळे राज्यातील रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. येथील वीस उद्योजक स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहेत..Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी... .हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे.एमआयडीसी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. वीजपुरवठ्याचा प्रश्नही गंभीर आहे. प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे . उद्योगमंत्र्यांनी प्रोटोकॉल सोडून सर्वसामान्यांसारखे चाकणला यावे. उद्या रविवार असल्याने त्यांनी येऊ नये. त्यांना नागरिकांच्या समस्यांची खरी जाण घ्यायची असेल तर त्यांनी प्रोटोकॉल , सुरक्षा बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांसारखे यावे. एमआयडीसी , पीएमआरडीए यांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. प्रत्येक कामाचा दर ठरलेला आहे.".यावेळी आदित्य ठाकरे यांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची पाहणी केली तसेच नागरिक ,कामगार यांच्याशी चर्चा केली.यावेळी दौऱ्यादरम्यान आमदार बाबाजी काळे , जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, शिवाजी वर्पे,जिल्हा परिषद सदस्य विजय शिंदे,विनया मुंगसे,तनुजा घनवट,पंचायत समिती सभापती विद्या मोहिते,सुरेश भोर,अमोल पवार,सुधीर मुंगसे, सुभाष मांडेकर, रुपाली कांबळे, दिलीप डुबे, सुदाम बोत्रे ,मंगेश पन्हाड आदी व इतर उपस्थित होते..शाहरूख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका, विमल इलायचीच्या जाहिरातीवरून नोटीस; कारवाई होणार?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.