

Maharashtra Health Minister reviews progress of new Pune Virology Institute and Serum's Cancer Vaccine
Sakal
पुणे : ‘‘केंद्राच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) धर्तीवर राज्याची स्वतःची महाराष्ट्र विषाणू विज्ञान प्रयोगशाळा (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी- एमआयव्ही) ही लष्कर परिसरात आकारास येत आहे. ही प्रयोगशाळा रोगनिदान क्षेत्रात आदर्श ठरेल,’’ असा विश्वास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.