
पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवीन युगातील सहा अभ्यासक्रम या वर्षीपासून सुरू होत आहेत. प्रत्येक ‘आयटीआय’च्या परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे एक ते दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.