

Maharashtra brings Jaggery industry under legal framework, aiming to regulate large units like sugar factories
Sakal
नरेंद्र साठे
पुणे : राज्यात वाढत्या गूळ उद्योगावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. गुळाच्या पारंपरिक व्यवसायाला आता मोठ्या प्रमाणावर औद्योगिक स्वरूप आले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांप्रमाणेच मोठ्या गूळ कारखान्यांनाही कायदेशीर चौकटीत आणण्याची तयारी सुरू आहे. पुढील नव्वद दिवसांत साखर आयुक्तालयाच्या माध्यमातून या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे.