Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी व माती गटातील दमदार कामगिरीनंतर जय पाटील, हर्षवर्धन सदगीर, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
Thrilling Semi-Finals in Maharashtra Kesari

Thrilling Semi-Finals in Maharashtra Kesari

Sakal

Updated on

स्वदेश घाणेकर

पुणे : रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत किताब गटातील गादी आणि माती विभागाच्या उपांत्यपूर्व तसेच उपांत्य फेरीच्या लढतींनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. कुठे एकतर्फी विजय, कुठे चुरशीची झुंज, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला थरार अशा विविध रंगांनी नटलेल्या या लढतींमधून अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले. गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, तर माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com