Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीची उद्या फायनल; सिकंदर-संदीप अन् हर्षद-शिवराजमध्ये रंगणार अंतिम सामना

माती आणि गादी प्रकारात दोन फायनल उद्या पार पडतील.
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीची उद्या फायनल; सिकंदर-संदीप अन् हर्षद-शिवराजमध्ये रंगणार अंतिम सामना

पुणे : जिल्ह्यातील फुलगाव इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. उद्या या स्पर्धेची अंतिम लढत पार पडणार आहे. यामध्ये माती विभागात सिंकदर शेख आणि संदीप मोटे तर गादी विभागात हर्षद कोकाटे आणि शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत होईल. यातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबाची लढत खेळविली जाईल. (Maharashtra Kesari Final math tomorrow between Sikander Shaikh Sandeep Mote and Harshad Kokate Shivaraj Rakshe)

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीची उद्या फायनल; सिकंदर-संदीप अन् हर्षद-शिवराजमध्ये रंगणार अंतिम सामना
World Cup 2023 : पुन्हा रंगणार भारत-न्यूझीलंड सेमीफायनल? भीमपराक्रम केला तर पाकिस्तानलाही संधी, जाणून घ्या समीकरण

प्रदीप कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्यानं ६६वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीची उद्या फायनल; सिकंदर-संदीप अन् हर्षद-शिवराजमध्ये रंगणार अंतिम सामना
NZ vs SL World Cup 2023 : न्यूझीलंडने श्रीलंकेचा केला पराभव अन् पाकिस्तानला दिला धक्का!

महाराष्ट्र केसरी वैभव

या स्पर्धेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थित मल्लांना संबोधितही केलं. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वैभव आहे. एक मोठी कुस्तीची परंपरा आहे. (Latest Marathi News)

खाशाबा जाधव यांच्या रुपानं भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळालं. यावर्षी एशियाड स्पर्धेत भारताला १०० पदकं मिळाली. मात्र, महाराष्ट्राच्या कुस्तीला मिळालं नाही. (Marathi Tajya Batmya)

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीची उद्या फायनल; सिकंदर-संदीप अन् हर्षद-शिवराजमध्ये रंगणार अंतिम सामना
World Cup 2023 : पाकिस्तानमुळे शेवटच्या क्षणी बदलणार सेमीफायनलचे ठिकाण? टीम इंडियाचा कुठे होणार सामना, जाणून घ्या

ऑलिम्पिक अन् कॉमनवेल्थचं मेडलं पाहिजे - फडणवीस

त्यामुळं आता आपल्याला विशेष काम कराव लागणार आहे. मागच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आपण मानधन वाढवलं होतं. राज्य सरकार मल्लांच्या पाठीशी उभं राहणार आहे. ज्या सोयींची अवश्यकता आहे ते आपण करू.

मल्लांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरतं मर्यादित राहू नये. जे जे लागेल ते आपण देऊ मात्र ऑलिम्पिक मेडल आणि कॉमनवेल्थचं मेडल मिळालं पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com