esakal | महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांना पितृशोक

बोलून बातमी शोधा

Maharashtra Kesari Rahul Kalbhor father ramchandra kalbhor passes away
महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांना पितृशोक
sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर व परिसरात पैलवान या नावाचे परीचित असणारे रामचंद्र विठ्ठल काळभोर (वय- ७२) यांचे मंगळवारी (ता. २७) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, चार बहीनी, पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. येथील विद्यमान सरपंच राजाराम काळभोर हे त्यांचे बंधू; तर महाराष्ट्र केसरी राहूल काळभोर हे त्यांचे पुत्र होत.

रामचंद्र काळभोर यांचा जन्म पैलवान कुंटुबात झाला होता. यामुळे व्यवसाय शेती असुनही, रामचंद्र काळभोर यांनी आपल्या तीनही मुलांना कुस्तीसाठी वेगवेगळ्या आखाड्यात ठेवले होते. या तीन मुलांच्यापैकी थोरला मुलगा, राहुल काळभोर हा २००३ चा महाराष्ट्र केसरी ठरला होता. रामचंद्र उर्फ दादा यांच्या जाण्याने लोणी काळभोर व परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान रामचंद्र काळभोर यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजनेच्या सुमारास लोणी काळभोर येथील स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.