

Maharashtra Kesari 2023 : गेल्यावेळची हुकलेली संधी अखेर सिकंदर शेख यानं पुन्हा खेचून आणत यंदाची 'महाराष्ट्र केसरी'ची गदा उंचावली. गतवेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला केवळ २३ सेकंदातच आस्मान दाखवत त्यानं ही स्पर्धा जिंकली. यानंतर प्रतिक्रिया देताना आपल्या यशाचं श्रेय त्यानं आपल्यासाठी राबलेल्या लोकांना दिलं. (Maharashtra Kesari Wrestling competition winner Sikandar Shaikh gives credit to his coach Chandrakant Kale and others)
"आज माझ्या वडिलांचं माझ्या चुलत्यांचं, महत्वाचं म्हणजे माझे वस्ताद चंद्रकांत काळे आणि आमचे इश्वरदादा हरगुडे, उत्तमदा, योगेश बंबाळे, अस्लमदा यांचं हे यश आहे. हे सगळे माझ्यासाठी खूप राबलेत. माझ्यासाठी हे सर्वजण पाच दिवस झाले उपाशी आहेत इथं. (Latest Marathi News)
आज पाच दिवस झाले मी इथं खेळतो आहे. गेल्यावर्षी संधी हुकली होती तेव्हाच मी बोलून दाखवलं होतं की पुढच्या वर्षी मीच मारणार" अशा शब्दांत महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर सिकंदर शेख यानं प्रतिक्रिया दिली आहे. (Marathi Tajya Batmya)
सिकंदर शेख हा मूळचा सोलापूरच्या मोहोळ इथला आहे. तो कोल्हापुरातील गंगावेस तालमीत त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. वस्ताद चंद्रकांत काळे यांनी त्याला कुस्तीचे धडे दिले. गेल्यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या कथित चुकीच्या निर्णयामुळं त्याला संधी गमवावी लागली होती. पण यंदा त्यानं महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.