

Land Survey Maharashtra New Rule K Copy With Latitude Longitude Will Be Accepted for Building Permission and Property Registration
sakal
पुणे : तुमच्या जमिनीची मोजणी केल्यानंतर मिळणाऱ्या ‘क’ प्रतीवर अक्षांश आणि रेखांश असतील, तर अशा जमिनींची मोजणी पुन्हा-पुन्हा करण्याची गरज नाही. ही मोजणी कायमस्वरूपी ग्राह्य धरली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाने याची राज्यभरात अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जमीन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.