
पुणे : तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे आहे, परंतु कसे जायचे हे माहिती नाही, तर तुम्ही गुगल मॅपची मदत घेता आणि इच्छित ठिकाणी पोहोचता. आता अशीच सुविधा तुम्हाला जर महसूल खात्याशी संबंधित सेवांबाबत मिळाली तर. आश्चर्य वाटेल ना; परंतु लवकरच ही सुविधा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी महसूल विभागाबरोबरच भूमिअभिलेख आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग अशा तिन्ही विभागांच्या सुविधा ‘युनिफाइड लँड मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (एकसमान जमीन व्यवस्थापन प्रणाली) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.