lawyer
sakal
पुणे - वकिलांवरील होणारे हल्ले रोखण्यासाठी तसेच वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून सोमवारी (ता. ३) कामकाजापासून अलिप्त राहणार असल्याचा ठराव झाला आहे. त्यामध्ये शिवाजीनगर न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील वकील सहभागी होणार आहेत. त्यामुळे, सोमवारी न्यायालयाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.