Maharashtra Launches Largest Leprosy Survey Ever
Sakal
पुणे
Leprosy Survey : महाराष्ट्रात साडेआठ कोटी लोकसंख्येची होणार कुष्ठरोगाची तपासणी; १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अभियान!
Government Health Campaign : राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नुकतेच कुष्ठरोगाला आरोग्य यंत्रणेकडे नोंद करणे सक्तीचे (नोटिफायबल डिसीज) म्हणून घोषित केले आहे.
पुणे : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे कुष्ठरोग रुग्णशोध अभियान राबविण्यात येणार असून ते १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यंदाच्या अभियानात १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून त्यातील ८ कोटी ६६ लाख लोकसंख्येची तपासणी करण्याचे उदि्दष्टय आहे. या मोहिमेसाठी ६५ हजार ८३२ पथके आणि १३ हजार १६६ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

