Maharashtra News : लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवे कायदे तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सभागृहात मागणी!

Lift Safety Rules : महाराष्ट्रातील लिफ्ट सुरक्षा नियम १९५८ च्या जुन्या धोरणानुसार असल्याने अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नवीन आणि आधुनिक लिफ्ट सुरक्षा नियम तातडीने लागू करण्याची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सभागृहात केली.
MLA Siddharth Shirole demands new lift safety rules in Maharashtra to prevent accidents

MLA Siddharth Shirole demands new lift safety rules in Maharashtra to prevent accidents

Sakal

Updated on

शिवाजीनगर : हौसिंग सोसायटीतील इमारतींमधील लिफ्टचे अपघात टाळण्यासाठी नवीन कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली. हौसिंग सोसायटीमधील लिफ्टच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी शासनाने ठरवलेले सध्याचे नियम हे १९५८ च्या लिफ्ट सुरक्षा धोरणाप्रमाणे निश्चित केलेले आहेत. हे नियम जुने झाले असून त्यामध्ये शासनाने बदल करणे अतिशय गरजेचे आहे. चिंचवडमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या अपघातात मृत्यू झाला. या गंभीर घटनेकडे लक्ष वेधून मागण्या मांडल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com