Maharashtra Monsoon Rainfall Deficit 2026
esakal
पुणे : मॉन्सून हंगामातील पावसाची राष्ट्रीय सरासरी ८६८.६ मिलिमीटर असून, ‘आयएमडी’च्या आकडेवारीनुसार यंदा देशभरात ७५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस २००१ पासूनचा चौथ्या क्रमांकाचा, तर १९०१ पासूनचा १३ व्या क्रमांकाचा तुटीचा पाऊस (Maharashtra monsoon rainfall deficit 2026) ठरला. यंदा वायव्य भारतात सरासरीच्या ९४.१ टक्के, मध्य भारतात ९७ टक्के, दक्षिण भारतात ७६ टक्के, तर पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीच्या ७४ टक्के पावसाची नोंद झाली.