Pune | महाराष्ट्र नॅचरल गॅस ची पाईप लाइन फुटून आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 बिबवेवाडी परिसरातील गॅस पुरवठा खंडित

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस ची पाईप लाइन फुटून आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी (पुणे) : स्वामी विवेकानंद मार्गावरील अप्पर येथील डॉल्फिन चौकात बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ड्रेनेजची नवीन पाईप लाइन चे काम सुरू असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाइन ला धक्का लागून झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात आग लागली, अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

विवेकानंद मार्गावर रस्त्याच्या एका बाजूला एमनजील ची गॅस पाईप लाइन असून संबंधित ठिकाणी काम करताना एमनजील चे अधिकारी, ठेकेदार व महापालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे अशा घटना घडत आहेत, यापूर्वी रस्त्याचे काम सुरू असताना अनेक वेळा गॅस पाईप लाइन फुटण्याचे प्रकार घडले आहेत, सुदैवाने रात्रीच्या वेळी घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रात्रीच्या वेळी घटना घडल्यामुळे गॅस पुरवठा खंडित करण्यात आला होता, पहाटे पाचच्या सुमारास दुरुस्ती करून गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला.

हेही वाचा: मालवण : गणित बिघडले | मासेमारीवर वादळाची वावटळ

समन्वयाच्या अभावामुळे रात्री काम सुरू करण्यात आले, संबंधित काम करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कल्पना न देता काम सुरू केल्यामुळे आग लागण्याची घटना घडली, शेजारी चैत्रबन झोपडपट्टी असून मोठी दुर्घटना टळली.

"रात्रीच्या वेळी काम सुरू करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली नव्हती, विदुत्त केबलला धक्का लागून झालेल्या अपघातात गॅस लाइन ने पेट घेतला, अग्निशमन दल व एमनजील च्या कर्मचाऱ्यांनी त्वरित आग आटोक्यात आणली."

- कौस्तुभ मिहीर ( महाराष्ट्र नॅचरल गॅस )

loading image
go to top