Video:पुण्यात मनसेचे भीक मांगो आंदोलन; स्वच्छतागृहाची केली मागणी

टीम ई-सकाळ
Sunday, 19 January 2020

गंगाधम चौकातील सार्वजनिक स्वछतागृह अनेक महिन्यापासून बंद आहे. महापालिका प्रसाशन स्वछतागृह सुरू करत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 

बिबवेवाडी (पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज, पुण्यात बिबवेवाडी येथे भीक मांगो आंदोलन केले. बंद पडलेल्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गंगाधम चौकातील सार्वजनिक स्वछतागृह अनेक महिन्यापासून बंद आहे. महापालिका प्रसाशन स्वछतागृह सुरू करत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळेच 
मनसेने भीक मांगो आंदोलन करून स्वछतागृह सुरू करणाची मागणी केली आहे. 
शहरात स्वछ भारत अभियान सुरू असून, त्याचवेळी मनसेने हे आंदोलन केले आहे. एकीकडे अस्तित्वात असलेली स्वछतागृह साफसफाई झालेली नाही तर दुसरीकडे स्वछतागृहांबाबत प्रसाशन निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे मनसेच्याकार्यकर्ते व नागरिकांनी भीक मांगो आंदोलन करत स्वछतागृहाची दुरुस्ती करून सुरु करण्याची मागणी केली आहे. या बाबत मनसेने प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या आहेत. पण तरीही काम न झाल्यामुळं मनसेनं आंदोलन केलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra navnirman sena bhik mango protest for public toilets in Pune bibvewadi