'अभ्यासक्रम कमी केला, तशी 'फी' पण कमी करा'; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

School-Students
School-Students
Updated on: 

पुणे : 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्षावर परिणाम झाल्याने शिक्षण विभागाने इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचा २५ 
टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. याचप्रमाणे शाळेचे शुल्कही कमी झाले पाहिजे. याबाबत शाळांना आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश सदस्य शैलेश विटकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. 

'कोरोना'मुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात शाळा कधी सुरू होतील, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे राज्य सरकारने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा सुमारे २५ टक्के अभ्यासक्रम कमी  करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

ज्याप्रमाणे अभ्यासक्रमात सुमारे २५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना विषाणू महामारीमुळे पालकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यावरचा आर्थिक बोजा कमी करणे आवश्यक आहे.

अद्यापही बहुतांश पालकांच्या पगारात ५० टक्के कपात होत आहे, अशा स्थितीत त्यांना शाळेचे शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे यंदा शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन पालक आणि विद्यार्थी यांना दिलासा दिला पाहिजे. याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी विटकर यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Baner Balewadi Garbage Depot Cleared
 Torna Fort Conservation | Nilesh Lanke Campaign
 Malegaon School Incident | Parents Demand Inquiry
Otur Police Action | Soybean Theft Case